मुंबई : बॉलिवूडच्या जगात खेळाडूपासून ते अगदी मास्टर असलेल्या सगळ्या दिग्गज मंडळींवर बायोपिक सिनेमे बनवण्याचे सिलसिले सुरू आहेत. या सगळ्यात अशी माहिती मिळाली आहे की, अभिनेता नंदमुरी बालकृष्ण (एनबीके) पहिल्यांदा एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहे. ते आपले वडिल नंदमुरी तारका रामाराव (एनटीआर) वर बायोपिक बनवली जात आहे. विद्या बालन एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाशी आणखी स्टारकास्ट जोडले जात आहेत याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बायोपिकमध्ये 'बाहुबली' सिनेमात खलनायक भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबाती देखील या सिनेमात असल्याचं कळत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या भूमिकेत दिसणार आहे. दग्गुबाती एनटीआर यांचा जावई देखील आहे. याबाबतची माहिती स्वतः दग्गुबती यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
Coming together to tell you a story of an incredible human phenomenon called “N.T.RamaRao” pic.twitter.com/O1j8TKkQnx
— Rana Daggubati (@RanaDaggubati) August 3, 2018
राणा दग्गुबातीने या गोष्टीला शेअर करताना एक फोटो देखील पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, तुम्हाला एका अविश्वसनीय व्यक्तीची एनटी राम राव यांची गोष्ट दाखवली जाणार आहे. सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 50 करोड रुपयात होणार आहे. हा सिनेमा नंदमुरी बालकृष्ण यांच्या तेलगू सिनेमांपैकी सर्वात मोठा बजेट असलेला सिनेमा असणार आहे. हा सिनेमा 2019 च्या संक्रांतीमध्ये रिलीज होणार आहे.