मुंबई : मलिका आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राम कपूर यांच्या वडिवांचं निधन झालं आहे. राम कपूर यांचे वडील अनिल कपूर यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 12 एप्रिल रोजी अनिल कपूर यांचं निधन झालं. ते एक प्रसिद्ध उद्योगपती होते. राम यांनी फोटो पोस्ट करत वडिलांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
फोटो शेअर करत राम म्हणाले, 'तुम्ही कायम आपल्या कुटुंबाचा भाग राहाल. आम्ही सर्व तुम्हाला खूप मिस करू...' त्यानंतर राम यांनी अमूल कंपनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. 'कंपनीद्वारे माझ्या वडिलांना दिलेल्या श्रद्धांजलीमुळे मी अत्यंत भावूक झालो आहे. ते खूप चांगले व्यक्ती होते.' असं कॅप्शन देत त्यांनी अमुल कंपनीचे आभार मानले आहेत.
दरम्यान, राम कदम यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 'मी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या सर्वांचं संरक्षण केलं आहे.' राम यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला.