राम गोपाल वर्माच्या ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’चा धमाकेदार ट्रेलर

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘गॉड सेक्स ट्रूथ’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या सिनेमात मिया मालकोवा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Jan 16, 2018, 03:30 PM IST
राम गोपाल वर्माच्या ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रूथ’चा धमाकेदार ट्रेलर title=

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘गॉड सेक्स ट्रूथ’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या सिनेमात मिया मालकोवा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

मिया मालकोवाचं डॅनी माऊंटनसोबत लग्न झालं आहे. डॅनी माऊंटनही पॉर्न स्टार आहे. मिया मालकोवानं २०१२ साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. तिचा हा बॉलिवूड सिनेमा २६ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. 

आता सनीला टक्कर द्यायला मिया मालकोवा येणार आहे. मिया बॉलीवूडमध्ये कितपत जम बसवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.मिया मालकोवा अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियाची आहे. मियाचं वय २५ वर्ष आहे. मियानं १६ व्या वर्षी मॅकडोनाल्डमध्ये कामाला सुरुवात केली होती. पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यापूर्वी मिया सिझलर्स नावाच्या फास्ट फूड चेनमध्ये काम करायची.