RGV Birthday: उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात गुंतल्याने राम गोपाल वर्माचा घटस्फोट?, सकाळी 10-15 मिनिट पाहायचे अडल्ट व्हि़डिओ

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात

Updated: Apr 8, 2021, 07:58 PM IST
RGV Birthday: उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात गुंतल्याने राम गोपाल वर्माचा घटस्फोट?, सकाळी 10-15 मिनिट पाहायचे अडल्ट व्हि़डिओ title=

मुंबई : राम गोपाल वर्मा यांनी 7 एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा केला. 'रंगीला', 'सत्य', 'शूल', 'कंपनी' यासारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्याच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी आपण जाणून घेऊया, त्याबद्दल ते कायम चर्चेत राहिले आहेत.कधी सकाळी लवकर अडल्ट व्हिडिओ पाहून तर कधी उर्मिला मातोंडकरमुळे झालेल्या घटस्फोटच्या चर्चेत असलेले वर्मा यांनी स्वत: सुरुवातीच्या काळात श्रीदेवीच्या संदर्भातला एक किस्सा सांगितला होता.

त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रात्री 2 किंवा 3 वाजता झोपलो असलो तरी मी, सकाळी 6च्या आधी उठतो. जागा होतोच, मी प्रथम 10 किंवा 15 मिनिटांसाठी अडल्ट व्हिडिओ पाहतो. त्यांनी सांगितले की, जर मी सकाळी एखादा अडल्ट व्हिडिओ पाहू शकलो नाही तर, त्याऐवजी 45 मिनिटांची कोणतिही डॉक्यूमेंट्री पहातो. सकाळी अडल्ट व्हिडिओ पहाण्यामागचं कारण म्हणजे, त्यांना एक्साइट करतात आणि बॉडीमधील केमिकल रिऐक्शनमार्फत ते पूर्ण दिवस त्यांचा एनर्जी कायम राहते.

उर्मिता मातोंडकरसाठी राम गोपाल वर्मा इतके वेडे होते की, यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला टाळायला सुरुवात केली आणि एका वृत्तांनूसार त्यांच्या पत्नीनेही उर्मिलाच्या कानाखाली मारली होती. असं म्हणतात की त्यांनी माधुरी दीक्षितलाही एका चित्रपटातून काढून टाकले होते. इंडस्ट्रीत अशी चर्चा होती की, राम गोपाल वर्माचे आणि तिच्या पत्नीचा घटस्फोट उर्मिलामुळे झाला. एक काळ असा होता की अभिनेत्री श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी ते तिच्या घराबाहेर तासांतास उभे असायचे.

राम गोपाल वर्मा हे श्रीदेवीचे जबरदस्त चाहते आहेत. स्वत: रामगोपाल यांनी ही संपूर्ण कहाणी एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. श्रीदेवीची क्रेझ एका सिनेमा हॉलपासून सुरू झाली होती आणि ही क्रेझ अशी होती की जेव्हा ते तिचा तेलूगू चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहातून बाहेर आले तेव्हा, त्यांना ती इतकी सुंदर वाटली की, ती खरी असूच शकत नाही. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक तिचे अनेक सिनेमे पाहिले आणि प्रत्येकवेळी तिचं टॅलेंट  आणि तिचं सौंदर्य वर्मा यांच्या सामोर एक वेगळच बेंचमार्क सेट करत होतं.

राम गोपाल वर्माचा श्रीदेवीबद्दलचं वेड अशा प्रकारे वाढू लागलं की, त्यांना असं वाटलं की, ही अभिनेत्री जणू काही दुसर्‍या जगातूनच आली आहे. आणि मग तिचा त्यांच्यासोबत प्रवास सुरु झाला तो म्हणजे फिल्म 'शिवा' या डेब्यू पासून, ते चेन्नई येथील नागार्जुनच्या कार्यालयापासू अशा ठिकाणी उभे असायचे जिथे श्रीदेवीचे घर जवळच होतं

राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की, 'श्रीदेवीसारख्या देवी या एका छोट्या दिसणार्‍या घरात राहत होती, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला असं वाटायचे की श्रीदेवीसारख्या देवीसाठी कोणतेही मानवनिर्मित घर पात्र नाही. 'ते तिच्या घराबाहेर उभा असायचे कारण तिची एक झलक मिळावी म्हणून, परंतु असं कधीही होऊ शकलं नाही.

यानंतर राम गोपाल वर्माचा 'शिवा' रिलीज झाला आणि बॉक्सऑफवर हिटही ठरला, त्यानंतर शिवा सिनेमाच्या निर्मात्याने त्यांना विचारलं की, श्रीदेवी सोबत एखादा चित्रपट बनवायचा आहे का? ते म्हणाले, 'तू वेडा झाला आहेस का? मी तिला पाहूनच मरेन' जिथे मीटिंगची व्यवस्था केली गेली होती. ते तेच होतं ज्याच्या बाहेर ते तिची एक झलक पाहण्यासाठी तासंतास उभे राहायचे.. निर्मात्यासह वर्मा श्रीदेवीच्या घरी पोहोचले,

श्रीदेवीच्या आईने सांगितले की, श्रीदेवीला मुंबईसाठी फ्लाईट पकडायची आहे म्हणून ती स्वत:ची बॅग पॅक करत आहे. तोपर्यंत ते दोघेही तिची वाट बसले होते, श्रीदेवी सामान पॅक करण्यासाठी या खोलीतून त्या खोलीत ये जा करत होती. आणि त्यावेळीच श्रीदेवी म्हणाली की, मला तुमच्याबरोबर एखादा चित्रपट करायला आवडेल आणि यानंतर ती मुंबईला रवाना झाली. वर्मा यांनी लिहिले की, यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर तिच्या आईशी संवाद चालू ठेवला.