बॉलिवूडच्या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली खरी, पण लूक पाहून चाहते हैराण

चाहत्यांना अभिनेत्रीचा पंजाबी देसी लूक असो किंवा मग  वेस्टन लूक असो प्रत्येक अवतार आवडतो. 

Updated: Sep 25, 2021, 11:00 PM IST
बॉलिवूडच्या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली खरी, पण लूक पाहून चाहते हैराण title=

मुंबई : रकुल प्रीत सिंग बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिचा चेहरा प्युअर इंडियन टच देतो. लोकांना रकुलचा पंजाबी देसी लूक असो किंवा मग भारतीय मुलीचा वेस्टन लूक असो प्रत्येक अवतार आवडतो. अतिशय छोट्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर ही अट आहे की, तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. पण आता तिच्या चाहत्यांना राकुलच्या फोटोमुळे राग येत आहे. कारण या फोटोंत रकुलला ओळखणंही कठीण झालं आहे.

पूर्णपणे बदलला चेहरा
रकुल प्रीत सिंगने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 4 लाखाहून अधिक लोकांनी काही वेळातच पसंत केला आहे. पण कमेंट वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की, नापसंत करणाऱ्यांची संख्या देखील यापेक्षा कमी नाही. खरंतर, या फोटोत, रकुलचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतोय. तिचा चेहरा नाक आणि गाल पाहून लोकांना शंका आहे की, तिने प्लास्टिक सर्जरी तर केली नसावी.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकांनी विचारलं ही आहे तरी कोण?
हा फोटो शेअर करत रकुलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ऑन डिमांड पोस्ट' यासोबत तिने स्माईल इमोटिकॉन्स बनवले आहेत. पण ज्यांनी ज्यांनी ही पोस्ट पाहिलीये त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. कमेंटमध्ये, एका युजर्सने लिहिलं आहे, 'ही कोण आहे?' तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'तिने प्लास्टिक सर्जरी केली का, यार, बॉलिवूड कलाकारांना काय झालं आहे? अशा अनेक कमेंट युजर्सने करुन अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. मात्र या सगळ्यावर रकुलची प्रतिक्रिया काय येतेय हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.