पति, पत्नी और 'वो'... लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये 'तिसरं' कोण

Rakul Preet Singh Post About Third Person Between Her And Husband : रकुल प्रीत सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं तिच्यात आणि नवऱ्यात कोण आलं...

दिक्षा पाटील | Updated: Aug 12, 2024, 10:12 AM IST
पति, पत्नी और 'वो'... लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये 'तिसरं' कोण title=
(Photo Credit : Social Media)

Rakul Preet Singh Post About Third Person Between Her And Husband : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिचा पती आणि निर्माता जॅकी भगनानी हे काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकले. त्यानंतर ते दोघेही सोशल मीडियावर एकमेंकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दरम्यान, या सगळ्यात आता रकुल प्रीक सिंगनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं की त्यांच्यात तिसरा कोणी आला आहे. तिनं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 

रकुल प्रीत सिंगनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जॅकी भगनानी हा विमानतळावर उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या एका हातात फोन आहे आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग असून तो कॉफी पिताना दिसतोय. या सगळ्याचा रकुलनं फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत रकुलनं कॅप्शन दिलं की 'त्याला कामापासून लांब ठेवणं खूप कठीण आहे... जॅकी, आम्ही, पती पत्नी और वो आहे.' दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Rakul Preet Singh shares Post About their is someone Between Her And Husband Jackky Bhagnani

काही दिवसांपूर्वी ते दोघे एकत्र सुट्टीचा आनंद घेत असल्याचे सांगितलं. त्या दोघांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. रकुल आणि जॅकीनं 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न केलं. त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रकुल काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'इंडियन 2' मध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर यांनी केले आणि लायका प्रोडक्शंस आणि रेड जायंट मूव्हीजनं मिळून निर्मिती केली. हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' चा सीक्वल आहे आणि त्यात कमल हासननं सेनापतीची भूमिका साकारली होती. 

हेही वाचा : डिंपल कपाडियांना करायचं होतं दुसरं लग्न? स्वत: खुलासा करत म्हणाल्या, 'मला स्वत:मध्ये...'

या चित्रपटात रकुल व्यतिरिक्त सिद्धार्थ, एसजे सूर्या, बॉबी सिम्हा, विवेक, प्रिया भवानी शंकर, गुलशन ग्रोव्हर, समुथिरकानी आणि नेदुमुदी वेणु देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सगळ्यात तिचे काही आगामी चित्रपट देखील आहेत.  'मेरी पत्नी का रीमेक' आणि 'दे दे प्यार दे 2' असे या चित्रपटांची नावं आहेत.