मुंबई : बॉलिवूड स्टार्सला ग्लॅमरच वलय असल्याने त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला ठाऊक असतात. पण त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपण तसे अनभिज्ञ असतो. म्हणजे जर त्यांचे कुटुंबिय लाईमलाईटपासून दूर असतील, तर त्यांच्याबद्दल प्रेक्षकांना जास्त माहिती नसते. ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा यांचे कुटुंबिय या ग्लॅमरस जगापासून दूर राहणेच पसंत करतात. रक्षाबंधनानिमित्त जाणून घेऊया अशा बहिण-भावाच्या जोड्या ज्यांची चर्चा तशी कमीच होते...
ऐश्वर्याची ख्याती जगभरात आहे. पण तिच्या भावाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय मर्चेंट नेव्हीत इंजिनियर आहे. दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग आहे. आदित्यने मॉडेल श्रीमा रायसोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आहे. आदित्यने फिल्म निर्मितीतही नशीब आजमावले होते. 'दिल का रिश्ता' हा त्याचाच सिनेमा होता. ज्यात ऐश्वर्या प्रमुख भूमिकेत होती.
अनुष्का आणि कर्णेश या भावाबहिणीचे स्ट्रॉग बॉन्डिंग आहे. एकमेकांना मदतीसाठी ते दोघेही कायम तयार असतात. विराट-अनुष्कामध्ये झालेले वाद मिटवून पुन्हा पॅचअप करण्याचे श्रेय कर्णेशच आहे. कर्णेश मर्चेंट नेव्ही होता. त्याचबरोबर तो अंडर १९ रणजी क्रिकेट टीमचा भागही होता. सध्या तो अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्सचा को-फाऊंडर आहे.
प्रियंकाने आपल्या अभिनयाचा झेंडा हॉलिवूडमध्ये लावला तरी तिचा भाऊ ग्लॅमरपासून चार हात लांबच आहे. सिद्धार्थ चोप्रा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहे. त्याने स्विजरर्लंडमधून शेफचे ट्रेनिंग घेतले आहे. त्याचबरोबर त्याचे पुण्यात एक पब लाऊंज मगशॉट कॅफे आहे.
दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचा भाऊ राजीव दुबईत राहतो.
परिणीती चोप्रा सध्या नमस्ते इंग्लंड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा भाऊ सहज चोप्राचा कुकीज बिजनेस आहे.