रेसलिंगनंतर राखी सावंतचा मोठा खुलासा

काय म्हणाली राखी

रेसलिंगनंतर राखी सावंतचा मोठा खुलासा  title=

मुंबई : हरियाणामध्ये एका विदेशी रेसलर रेबलसोबत फाइट झाल्यानंतर राखी सावंतला अंबालातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. राखी सावंतचं परदेशी महिला कुस्तीपटूने आदळल्यानंतर कंबरेला मोठी दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राखीशी बातचित केल्यानंतर आपल्यासोबत धोका झाल्याचा खुलासा तिने केला आहे.

राखीने सांगितलं की, ती तेथे फक्त डान्समध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. तिथे अशाप्रकारे कोणती फाईट होणार आहे याबाबत तिला काहीच कल्पना नव्हती. मात्र डान्स दरम्यान रेबलने धोक्याने तिला हवेत उडवून जमिनीवर आपटलं. यामध्ये राखीची कंबर तुटली असून तिला रूग्णालयात दाखल केलं आहे. 

राखीने सांगितलं की, ती लवकरच विदेशी रेसलरचा बदला घेणार आहे. एकदा तिची तब्बेत ठीक झाली तर ती त्या विदेशी रेसलरला पकडून मारणार आहे. राखीला मारण्यासाठी रेबलला पाठवण्यात आलं होतं. पण तिला हे माहित नाही की, रेबलला कुणी पाठवलं होतं. राखीचा हा फाइटचा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला ता द ग्रेट खली राखी सावंतची भेट घेण्यासाठी गेला. त्याने राखीची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तिचं सांत्वन केलं.