Rakhi Sawant Husband : राखी सावंत ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राखीसोबत वाद आणि त्याच्या दुसऱ्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे. आता त्यानं असं काही सांगितलं की ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे मॅरिटल रेपवर त्यानं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
राखी सावंतसोबतच्या वादावर आदिल खान दुर्गानीचा मार्च महिन्यात एक फोटो समोर आला होता. यात तो नवरदेवाच्या रूपात दिसत होता. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यानं खुलासा केला की त्यानं दुसरं लग्न केलं. 'बिग बॉस 12' चे स्पर्धक सोमी खानला त्याची पत्नी म्हणून स्वीकारलं. सध्या त्यांनी मॅरिटल रेपवर असलेल्या वक्तव्यावर मोठा वाद सुरु झाला आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत आदिलनं ही कमेंट केली की जेव्हा तो राखी सावंतच्या त्याच्या विरोधात करण्यात आलेल्या रेपच्या आरोपांवर वक्तव्य केलं. त्यानं म्हटलं की जितकं मी पाहतो, तितकं तर मॅरिटल रेप सोसायटीमध्ये होत नाही. मी अनेकांना ओळखतो आणि माझे अनेक मित्र हे दुसऱ्या देशात देखील आहे. मी तर कधीच मॅरिटल रेप झाल्याचे ऐकलं नाही. बलात्काराच्या तुलनेत मॅरिटल रेपची प्रकरण खूप कमी आहेत.
आदिलनं पुढे यावर त्याचं मत मांडत सांगितलं की जर एक पुरुष आणि एक महिलेला एकत्र काही करण्याची इच्छा होत नाही का? हे त्यांच्यात असलेल्या प्रेमाच्या कमीमुळे होत असेल. त्यांनी म्हटलं की अशात त्यांनी एकत्र रहायला नको, कारण दोघांमध्ये मुळीच प्रेम राहिलेलं नाही. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला 7 फेब्रुवारी 2023 ला अटक करण्यात आली होती. 5 महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिलची सुटका झाली होती.
हेही वाचा : लेकीसाठी नॅनी ठेवणार नाही दीपिका पदुकोण? 'या' अभिनेत्रीच्या पेरेंटिग स्टाइलला करणार फॉलो!
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिरवर फेब्रुवारी 2023 मध्ये एका ईरानी महिलेचा बलात्कार करण्याता आरोप होता. 30 वर्ष जुन्या ईरानी महिलेच्या तक्रारीनंतर आदिल खानवर मैसूरमध्ये तक्रार दाखल केली होती. कथितपणे, ईरानी महिला फार्मेसीमध्ये मेडिकलचं शिक्षण करण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून 2018 मध्ये भारतात आली होती. त्यावर्षी तिची आणि आदिलची भेट झाली. दोघांमध्ये जवळीकता वाढली. त्या महिलेनं आरोप केले की आदिलनं वचन दिलं होतं की तो तिच्याशी लग्न करणार. पीडित महिलेनं हा दावा केला की ती 3 वर्ष आदिलसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. मग त्यानंतर तिनं आदिलवर लग्न कर असा सतत जोर दिल्यानंतर आदिलनं तिला धमकी दिली आता तिची मारहाण केली.