Rakhi Sawant: हनिमूनला जाण्याआधी राखी सावंत करणार 'हे' काम, म्हणाली "नातं पक्कं झालं तर..."

Rakhi Sawant, Adil Durrani: आदिलने देखील राखीच्या होकारात होकार मिळवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यांचं नात घट्ट असल्याचं दिसतंय.

Updated: Jan 20, 2023, 07:28 PM IST
Rakhi Sawant: हनिमूनला जाण्याआधी राखी सावंत करणार 'हे' काम, म्हणाली "नातं पक्कं झालं तर..." title=
Rakhi Sawant,Adil Durrani

Rakhi Sawant Honeymoon: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant Arrested) गुरुवारी आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राचा (Sherlyn Chopra) आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री राखीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर राखीने तिच्या आईच्या (Rakhi Sawant Mother) प्रकृतीवर भाष्य केलं. त्यानंतर एका मुलाखतीत राखीने मोठं वक्तव्य केलंय. (Rakhi Sawant reveals she will perform Umrah with husband Adil before honeymoon)

काय म्हणाली राखी?

मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आली आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे. मला देखील अस्वस्थ वाटतंय, मी दिवसभर खाल्लं नसल्याने माझा बीपी स्लो झालाय, असंही राखी म्हणाली होती. राखी सावंतची (Rakhi Sawant) आईने कॅन्सरने ग्रस्त आहे. अशातच शर्लिन चोप्राच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात राखीच्या अडचणी वाढल्या आहेत.

कुठं जाणार Rakhi Sawant?

माझ्यासाठी तसेच आदिलसाठी (Adil Durrani) उमराहला जाणं गरजेचं आहे. तिथं कोणाचं नातं पक्कं झालं तर जगात ते कोणीही तोडू शकत नाही, असं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. त्यावेळी आदिलने देखील राखीच्या होकारात होकार मिळवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यांचं नात घट्ट असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, 'गंगूबाई' स्टाईलमध्ये पडली बाहेर

उमराह (Umrah) म्हणजे काय?

दरम्यान, मक्कामधील हरम शरीफ यांच्या यात्रेला उमराह (Umrah 2023) म्हटलं जातं. लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं दर्शन, असा अरबी भाषेत उमराहचा अर्थ होतो. ही एक धार्मिक यात्रा असल्याने अनेकजण जाताना दिसतात. उमराह केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याच्या पापातून मुक्त होतो, असं मुस्लीम समाजात असं मानलं जातं.