Rakhi Sawant चं कॅमेऱ्यासमोर नियंत्रण सुटलं! बॉयफ्रेंडला खेचलं आणि...

ड्रामा क्विन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. म्हैसूरचे व्यापारी आदिल दुर्रानी सोबत तिचं सध्या सुत जुळलं आहे. 

Updated: Sep 28, 2022, 08:34 PM IST
Rakhi Sawant चं कॅमेऱ्यासमोर नियंत्रण सुटलं! बॉयफ्रेंडला खेचलं आणि... title=

Rakhi Sawant Viral Video: ड्रामा क्विन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. म्हैसूरचे व्यापारी आदिल दुर्रानी सोबत तिचं सध्या सुत जुळलं आहे. आपल्या प्रेमाची कबुली राखी सावंत (Rakhi Sawant) जाहीरपणे देत असते. पण कधी कधी तिचं वागणं एखाद्याला आवाक् करणारं असतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत राखी सावंत असंच काहीसं केलं. त्यामुळे पॅपराजीलाही डोक्यावर हात मारण्यास भाग पडलं. 

बऱ्याच दिवसांनी राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani) एकत्र दिसले. त्यांना पाहताच मीडियाचे कॅमेरे तिथे पोहोचले. कॅमेरे पाहिल्यानंतर राखीला काय झाले ते कळलेच नाही. यावेळी तिचं वागणं विचित्र होतं. काही क्षणातच विचित्र हरकती करू लागली. तिची कृती पाहून आदिलने तिला हटकलं आणि तसं करू नको असं बजावलं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बॉसच्या या सीझनमध्ये येण्याची राखी सावंतनं इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी आदिलसोबत शोमध्ये एंट्री घेऊन लग्न करणार आणि सलमान खान कन्यादान करेल, असंही तिनं सांगितलं आहे.नुकतेच राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचे 'तू मेरे दिल में रहने के लायक नहीं' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. राखी केवळ एंटरटेनर नसून ती टीआरपी क्वीनही आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात दिसली  आणि लोकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे.