Bigg Bossमधील Catfightनंतर राखी सावंतला दुखापत, ऑपरेशचा व्हिडिओ समोर

अभिनेत्री राखी सांवत जखमी

Updated: Aug 31, 2021, 05:43 PM IST
Bigg Bossमधील Catfightनंतर राखी सावंतला दुखापत, ऑपरेशचा व्हिडिओ समोर title=

मुंबई : सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसचा भाग असलेल्या राखी सावंतने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आणि शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या नाकाचा उपचार कसा केला हे सांगितलं. अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्याच्या सुरुवातीला तिने बिग बॉसच्या घरात तिला कधी आणि कशी दुखापत झाली हे दाखवलं आहे.
  
बिग बॉस 14 मध्ये झाली नाकाला दुखापत 
यानंतर, पुढे व्हिडिओमध्ये तिने दाखवलं आहे की, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या नाकावर कसे उपचार झाले आणि कसं नाक बरं झालं. व्हिडिओ शेअर करताना राखी सावंतने लिहिलं, 'धन्यवाद डॉ जितेश शेट्टी. बिग बॉस 14 मध्ये माझ्या नाकाला दुखापत झाली. मला खूप वेदना झाल्या पण एक किंवा दोन लोकांशिवाय कोणीही मला साथ दिली नाही.

शस्त्रक्रियेनंतर आराम
राखी सावंतने कॅप्शमध्ये पुढे लिहिलं की, 'बिग बॉस 14 संपल्यानंतर डॉक्टर जितेश शेट्टी यांनी माझं ऑपरेशन केलं आणि आता मी खूप आनंदी आहे. मी वेदनेपासून मुक्त झाली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. ' राखी सावंत डायनिंग टेबलवर बसली होती. तेव्हा जस्मिन भसीनने तिच्या डोक्यावर एक मोठा प्रॉप ठेवला. त्यानंतर राखी सावंतच्या नाकाला दुखापत झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोणीही पाठिंबा दिला नाही
व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, विकास गुप्ता कुटुंबातील सदस्यांना कश्या शिव्या देत आहेत कारण कोणीही राखी सावंतची काळजी करत नाही आणि कोणीही तिला पाठिंबा देत नाही. राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जातं, बिग बॉस 14मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून ती गेली होती आणि तिने शोमध्ये प्रवेश करताच टीआरपी खूप वेगाने वाढला होता.