'माझ्या वस्तू दुसरा व्यक्ती वापरायचा...' राखी सावंतच्या एक्स पतीने सोडलं मौन

राखी सावंतच्या आरोपांनंतर एक्स पती रितेशने सोडलं मौन म्हणाला...   

Updated: Jun 14, 2022, 02:44 PM IST
'माझ्या वस्तू दुसरा व्यक्ती वापरायचा...' राखी सावंतच्या एक्स पतीने सोडलं मौन   title=

मुंबई : टीव्ही विश्वातील ड्रामा क्विन राखी सावंतने एक्स पती रितेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रितेश मला प्रचंड त्रास देत असल्याचं सांगत राखी माध्यमांसमोर प्रचंड रडली. एवढंच नाही तर, रितेशने राखीचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि जीमेल अकाउंट हॅक केले असल्याचं समोर येत आहे. राखीने सांगितलं की, रितेशने सर्व अकाउंट स्वतःच्या नावावर केले आहेत. त्यामुळे Google Pay आणि Paytm सारखे अॅप देखील राखी  वापरू शकत नाही. 

राखीच्या या आरोपांवर आता एक्स पती रितेशने मौन सोडलं आहे. ETimes शी बोलताना रितेश म्हणाला, "जेव्हा मी राखीवर कोट्यवधी  रुपये खर्च करायचो, तेव्हा तिला कोणतीही अडचण आली नाही. मी पैसे खर्च करणे बंद केल्यावर तिनी आरोप करायला सुरुवात केली. यासाठी आता तो कायदेशीर मार्गाने राखीला सामोरे जाणार आहे. 

रितेश आता राखीला देणार उत्तर
राखी येत्या काळात माझी बदनामी करू शकते, असे रितेशने सांगितलं. 'ती एक मोठी ड्रामा क्वीन आहे, ती काहीही करू शकते. मी आता राखीला सोडलं आहे. मी माझ्या आयुष्यात फार आनंदी आहे. राखीने माझा मानसिक छळ केला आहे.' असं देखील रितेश म्हणाला आहे. 

पतीपासून विभक्त झाल्यानंतर राखी खूप रडताना दिसली. महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांनंतर राखीने पुन्हा प्रेमात पडल्याचं सांगितलं. सध्या राखी आदिन दुर्रानी नावाच्या बिझनेसमनला डेट करत आहे. ज्याने राखीला 40 लाखांची कारही भेट दिली. एवढंच नाही तर दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे.