पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह राखीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

नेटकऱ्यांनी तिच्या देशप्रेमावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले.... 

Updated: May 9, 2019, 12:48 PM IST
पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह राखीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : वाद आणि राखी सावंत हे समीकरण काही केल्या वेगळं होणारं नाहीय किंबहुना वाद म्हणलं की एक नाव लगेचच डोक्यात येतं. ते नाव म्हणजे आयटम गर्ल राखी सावंत हिचं. बहुविध कारणांनी चर्चांच्या वर्तुळात असणारी राखी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. इतकच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींची माहिती ती फॉलोअर्सना देत असते. सध्याही तिची अशीच एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यामुळे राखीने अनेकांचा रोषही ओढावला आहे. 

भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरू असणारं सध्याचं तणावाचं वातावरण पाहता राखीने यातही एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती एका नदीच्या काठावर असणाऱ्या उंचवट्याच्या भागावर पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने पाकिस्तानचा राष्ट्रध्व पकडलेला दिसत आहे. ''माझं प्रेम हे भारतावरच आहे. पण, ही माझी आगामी 'धारा ३७० (Dhara 370)' या चित्रपटातील भूमिका आहे'', असं कॅप्शन तिने या फोटोंसह दिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

width: 640px; height: 50px;

width: 640px; height: 156px;

राखीने चित्रपटाच्या कारणास्तव का असेना. पण, पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह फोटो पोस्ट केल्यामुले चाहत्यांनी मात्र तिला निशाण्यावर धरलं आहे. देशद्रोही असं म्हणत तिचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही पोस्ट तिला चांगलीच महागात पडली, असं म्हणायला हरकत नाही. या फोटोंसह राखीने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. आपण या चित्रपटात एका पाकिस्तानी तरुणीची भूमिका साकारत असल्याचं सांगत ती या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील सर्व जनता वाईट नसल्याचं वारंवार स्पष्ट करत आहे. आपण पाकिस्तानचा आदर करतो, असंही ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. परिणामी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येही तिच्यावर मोठ्या प्रमाणात आगपाखड करण्यात आली आहे.