राखी सावंतचा मोठा गौप्यस्फोट; चक्क अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार केल्याचा लावला आरोप

राखी सावंतला जर एखादं टाइटल दिलं गेलं तर ते असेल कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन. 

Updated: Aug 2, 2022, 04:53 PM IST
राखी सावंतचा मोठा गौप्यस्फोट; चक्क अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार केल्याचा लावला आरोप title=

मुंबई : राखी सावंतला जर एखादं टाइटल दिलं गेलं तर ते असेल कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन. राखी रोज नवनवीन विधानं करत असते. राखीने एका खास पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. यावेळी राखी अभिनेत्री तनुश्री दत्ताबद्दल बोलत आहे. या पत्रकार परिषदेत राखी सावंतने काय म्हटलं होतं आणि तनुश्रीवर कोणते आरोप केले होते ते जाणून घेऊया..

Rakhi Sawant वर या अभिनेत्रीने केला Rape!
आम्ही ज्या पत्रकार परिषदेबद्दल बोलत आहोत ती चार वर्षे जुनी आहे. म्हणजेच राखी सावंतचं हे विधान 2018 सालचं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत राखी सावंतचं भांडण सुरू असताना पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. पत्रकार परिषदेत राखीने सांगितलं की, 2018 च्या आधी 12 वर्षांपूर्वी तनुश्रीने तिला अनुचित स्पर्श केला होता आणि तनुश्रीने राखीवर अनेकदा बलात्कार केल्याचंही सांगितलं.

Tanushree Duttaला Rakhi म्हणाली 'लेस्बियन'
याच पत्रकार परिषदेत राखीने सांगितलं की, तनुश्री दत्ता खरंतर लेस्बियन आहे. तनुश्री तिला अनेक रेव्ह पार्ट्यांमध्ये घेऊन गेली आहे. इतकंच नाही तर राखीने तिच्या देखरेखीखाली ड्रग्जही घेतल्याचंही राखीने सांगितलं. राखीचा दावा आहे की, तनुश्री दत्ताने तिचे केस कापले होते, तेही ती होमोसेक्शु असल्यामुळे.