Salman Khan: सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार, खर्च केले इतके कोटी

Salman Khan bought a bulletproof car : सलमान खान सध्या त्याच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत आहे. त्याने आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही पाऊलं उचलली आहेत.

Updated: Aug 2, 2022, 04:40 PM IST
Salman Khan: सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार, खर्च केले इतके कोटी title=

मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान त्याच्या सुरक्षेबाबत आता अधिक गंभीर झाला आहे. त्याचे चाहते त्याची काळजी करत आहेत. सलमान खानला काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र आले होते. तेव्हापासून सलमान खानची सुरक्षा अत्यंत कडक ठेवण्यात आली आहे. सलमानही आता त्याच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत आहे. नुकतेच त्याने शस्त्र परवाना घेतला होता आणि आता त्याने बुलेटप्रूफ कार ही खरेदी केली आहे.

सलमान खान नुकताच त्याचा बॉडीगार्ड शेरासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला. जिथे सलमानने टोयोटा लँड क्रूझरमध्ये एंट्री मारून लोकांचे लक्ष वेधून घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानची ही नवीन कार बुलेटप्रूफ आहे, ज्याची किंमत 1.5 कोटी सांगितली जात आहे. सलमानच्या नव्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खानची ही कार टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही आहे. carwale.com ने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या लँड क्रूझरमध्ये 4461 सीसी इंजिन आहे, ज्याची पावर 262 bhp आहे.

सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान यांना त्यांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान एका बेंचवर ठेवलेले एक पत्र मिळाले होते. ज्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसही सलमानच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले असून त्यांनी अभिनेत्याला शस्त्र ठेवण्याचा परवाना जारी केला आहे.