Raju Srivastava अद्यापही बेशुद्ध, प्रकृती चिंताजनक

राजू  यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी कुटुंब, चाहते यांची प्रार्थना आणि डॉक्टरांच्या प्रयत्न सुरु आहेत.  

Updated: Sep 12, 2022, 09:13 AM IST
Raju Srivastava अद्यापही बेशुद्ध, प्रकृती चिंताजनक title=

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Health Update)  गेल्या 31 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत होती. परंतू आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे. राजू  यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी कुटुंब, चाहते यांची प्रार्थना आणि डॉक्टरांच्या प्रयत्न सुरु आहेत. पण 32 दिवसांनंतरही त्यांना अद्यापही शुद्ध आलेली नाही. त्यामुळे कुटुंब आणि चाहत्यांची चिंता वाढत आहे. 

32 दिवसांपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर 
राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात दाखल करून 32 दिवस झाले आहेत, मात्र अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना शुद्ध आली होती, पण त्या फक्त अफवा असल्याचं समोर येत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)

मिळालेल्या माहितीनुसार, राजू बर्याच काळापासून बेशुद्ध आहे आणि त्याचा मेंदू पाहिजे तसा कार्य करत नाही... हीच भीती डॉक्टरांना सतावत आहे. राजू अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांना कोविड किंवा कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. (raju shrivastav health update)

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)