Raju Srivastav अजूनही बेशुद्धावस्थेत, पत्नी म्हणाली; "फक्त इतकंच सांगू शकते..."

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांनी प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या त्यांच्या पत्नीशिवाय कोणालाही आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी नाही.

Updated: Sep 7, 2022, 05:32 PM IST
Raju Srivastav अजूनही बेशुद्धावस्थेत, पत्नी म्हणाली; "फक्त इतकंच सांगू शकते..." title=

Raju Srivastav Health Updates: हास्य कलाकार आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) 29 दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने राजू यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, इतके दिवस होऊनही राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आलेली नाही. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याची बातमी आली होती. मात्र राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा (Raju Srivastav Wife Shikha) यांनी प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या त्यांच्या पत्नीशिवाय कोणालाही आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी नाही.

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी फक्त एवढेच म्हणेन की त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर आपले सर्वोत्तम देत आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे."

 वर्कआउट करत असताना राजू यांच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि बेशुद्ध झाले. त्यानंतर लगेचच दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिथे 11 डॉक्टरांची टीम राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांचे चाहते आणि संपूर्ण कुटुंब ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही (Raju Srivastav friends) भेटण्यास मनाई केली आहे. याचे कारण संसर्गाची भीती सांगितली आहे. व्हेंटिलेटरवर संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे आता कोणीही राजू यांना भेटू शकत नाही.