मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा हे इंडस्ट्रीतील आनंदीत विवाहित कपलपैकी एक आहेत. 11 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला लग्न केलं. हे कपल लग्नाआधीच त्यांच्या नात्याबद्दल खूप बोलले असले तरी दोघांनीही त्यांचं अफेअर कधीच लोकांच्या नजरेपासून लपवलं नाही. लग्नाआधीही दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
राजकुमार आजही अनेकदा त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नीसोबतचे गोंडस फोटो शेअर करत असतो. मात्र अलीकडेच अभिनेत्याने पत्रलेखाचा असा फोटो शेअर केला आहे. ज्याने लोक हैराण होत आहेत. काही सेकंद हा फोटो जवळून पाहिल्यानंतर पत्रलेखाची पोझ लोकांना समजते. त्यामुळे लोकं अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करून त्यांची खिल्ली उडवत आहेत.
वास्तविक, राजकुमारने शेअर केलेल्या फोटोमध्ये पत्रलेखा आरशासमोर पाठमोरी बसली आहे आणि आरशात तिची पाठ आणि पाय दिसत आहेत. पत्रलेखाची ही पोज लोकांना पहिल्या नजरेत थोडी विचित्र वाटत आहे, ज्यामुळे ते तिची खिल्ली उडवत आहेत. फोटोमध्ये, अभिनेत्रीने पांढरा शर्ट घातला आहे याचबरोबर तिने यावर काळ्या रंगाचे शूज घातले आहेत आणि राजकुमार आपल्या पत्नीचा एक गोंडस स्माईलसह फोटो क्लिक करताना दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.