फोटो : ८० वर्षांच्या अभिनेत्रीला किस करण्यासाठी राजकुमार रावला द्यावे लागले १८ रिटेक

 बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी चित्रपट बहन होगी तेरीचा ट्रेलर रिलीज झाला आह. या ट्रेलरनुसार हा चित्रपट रोमॅटिंक कॉमेडी असल्याचे दिसते आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट वादात अडकला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 31, 2017, 04:19 PM IST
फोटो :   ८० वर्षांच्या अभिनेत्रीला किस करण्यासाठी राजकुमार रावला द्यावे लागले १८ रिटेक  title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी चित्रपट बहन होगी तेरीचा ट्रेलर रिलीज झाला आह. या ट्रेलरनुसार हा चित्रपट रोमॅटिंक कॉमेडी असल्याचे दिसते आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट वादात अडकला आहे. 

चित्रपटातील एक ट्रेलर सीन सध्या खूप व्हायरल होत आहे. यात राजकुमार राव याला ८० वर्षाच्या एका अभिनेत्रीशी लिपलॉक करताना दिसत आहे. 

या ८० वर्षीय अभिनेत्रीचे नाव कमलेश गिल असून यात राजकुमारला तोंडाने श्वास देण्याचा सीन आहे. आता हा सीन खूप व्हायरल होत आहे. 

या सीनसाठी राजकुमार राव याला १८ रिटेक द्यावे लागले. हा सीन करताना राजकुमारला खूप हसू येत होते. त्यामुळे काम वारंवार बिघडत होते. हा सीन करताना सेटवर लोक राजकुमारची मस्करी करत होते की तो आजींना स्मूच करीत आहे.