मुंबई : जगभरात मानाच्या समजल्या जाणार्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा या विभागात ‘न्यूटन’या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. राजकुमार राव या अभिनेत्याने ‘न्यूटन’मध्ये काम केले असून शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
'न्यूटन' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे. २६ चित्रपटांतून ‘न्यूटन’या चित्रपटाची निवड झाली आहे.
छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर या चित्रपटाची कहाणी बेतली आहे. या चित्रपटामध्ये राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे.
राजकुमार चे पात्र आदर्शवादी आणि सरकारी क्लार्कचे आहे. त्याला एका नक्षलवादी भागात मतदानाकरिता पाठवले जाते.
राजकुमारने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
Very happy to share this news that #NEWTON is India's official entry to the #OSCARS this year. Congratulations team.
— Rajkummar Rao (@RajkummarRao) September 22, 2017
'बरेली की बर्फी', 'ट्रेप्ड' या चित्रपटामधील राजकुमारच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप सोडली आहे. लवकरच राजकुमार राव हा ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरसोबत 'फन्ने खान' चित्रपटामध्ये झळकणार आहे.