मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपला नवी ओळख दिली. पत्रलेखा आणि राजकुमार लग्नबंधनात अडकले.
चाहत्यांसाठी ही जितकी आनंदाची गोष्ट होती, तितकीच ती राजकुमार आणि पत्रलेखासाठी अविश्वसनीय बाब होती.
अकरा वर्षांचं रिलेशनशिप असूनही आपण आजच एकमेकांना डेट करु लागलोय, अशीच भावना राजकुमारच्या मनात आजही आहे.
बॉलिवूडच्या या जोडीच्या लग्नाचा एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'द वेडिंग फिल्मर' या युट्यूब चॅनलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये पत्रलेखा तिच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसते. तर, राजकुमार आपल्या या प्रेयसीला वधुरूपात पाहून काहीसा भावूक होताना दिसतो.
प्रेमाच्या व्यक्तीसोबतच आयुष्यभराचं नातं जोडलं जाणं, ही भावना नेमकी काय असते हेच या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
लग्नातला एक खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
जिथं राजकुमार पत्रलेखाच्या भांगात कुंकू भरतो. त्याचप्रमाणं तीसुद्धा राजकुमारच्या माथी कुंकू लावून प्रेमाची आणि नव्या नात्याची ग्वाही देताना दिसते.