सन्मान : सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार 

Updated: Apr 1, 2021, 10:59 AM IST
सन्मान : सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  title=

मुंबई : साऊथ सिनेमातील दिग्गज अभिनेता रजनीकांत (Superstar Rajinikath) यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी याबाबत घोषणा केली. (Rajinikanth Will Receive The Dadasaheb Phalke Award For 2019) कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात थैमान घालत असल्यामुळे ही घोषणा उशिराने करण्यात आली. 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेसृष्टीत सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. यंदाचा पुरस्कार 'थलायवा' रजनीकांत यांना जाहिर करण्यात आला आहे. 

काय म्हणाले प्रकाश जावडेकर?

यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (dadasaheb phalke award)  जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’

रजनीकांत गेल्या 5 दशकांपासून सिनेमावर राज्य करत आहे. यंदाची निवड ही सिलेक्शन ज्युरी मार्फत करण्यात आली आहे. या ज्यूरीत आशा भोसले, मोहनलाल, विश्वजीत चॅटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई यांचा समावेश होता.

प्रत्येक सिनेमानंतर हिमालय ‘ब्रेक’

प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे 35 फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.