Rajinikanth on Ayodhya Mandir : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथे असेलल्या निवासस्थानी गेले होते. तर काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ते अयोध्या आणि हनुमानगढी मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
काल रजनीकांत हे अयोध्या आणि हनुमानगढी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. रजनीकांत यांनी हनुमान मंदिरात तिथे फक्त दर्शन घेतले नाही तर आरती देखील केली. हनुमानगढी येथून निघाल्यानंतर रजनीकांत हे सरळं राम जन्मभूमि परिसरात पोहोचले. यावेळी रजनीकांत यांना पुजाऱ्यांनी तीर्थ दिलं. जिथं ते जवळपास पाच मिनिटं रामलल्लाच्या मूर्तीला न्याहाळत होते. त्यानंतर रजनीकांत यांनी मीडियाशी संवाद साधला आणि म्हणाले की ते भाग्यशाली आहेत. इतकंच नाही तर राम मंदिरवर ते म्हणाले की 'हे कधी पूर्ण होईल याच्या प्रतिक्षेत आहे.'
Here are the two opposing views..
View 1: A large section of the People of TN are upset that #Superstar fell on the feet of UP CM..
View 2: UP CM is Mahant of #Ghoraknath Mutt.. So #Superstar fell on his feet for religious reasons..
Your Take? pic.twitter.com/xhAZfVqlqU
— Ramesh Bala (@rameshlaus) August 19, 2023
दरम्यान, रजनीकांत हे चार धाम यात्रेवर आहेत. रजनीकांत याआधी बद्रीनाथच्या दर्शनासाठी गेल्याचे आपण पाहिले. त्यानंतर शनिवारी लखनऊ पोहोचले. तिथे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत गाडीतून उतरल्यानंतर ते लगेचच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेताना दिसतात. तर सीएम योगी फुलांचा गुच्छ देत रजनीकांत यांचे स्वागत करताना दिसतात. या दरम्यान, एक पुस्तक आणि एक शोपीस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रजनीकांत यांना देताना दिसले. काही काळ बोलल्यानंतर रजनीकांत तिथून थेट त्यांच्या हॉटेलवर निघाले.
हेही वाचा : भाजपा खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव अचानक रद्द, 'हे असं कसं?' काँग्रेस संतप्त
रजनीकांत यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते नुकतेच 'जेलर' या चित्रपटात दिसले. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. तर रजनीकांत हे टायगर मुथुवेल पांडियन ही भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्या या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वयाच्या 72 व्या वर्षी रजनीकांत हे अॅक्शन करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. तर या चित्रपटात रजनीकांत हे एका वाईट वृत्तीच्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी तलवारी हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.