Raj Kundra पोर्नोग्राफी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा आजही पोर्नोग्राफी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे,  पण सुप्रीम कोर्टाने निर्णय सुनावल्यानंतर   

Updated: Dec 14, 2022, 11:00 AM IST
Raj Kundra पोर्नोग्राफी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय  title=

Raj Kundra Pornography Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) आजही पोर्नोग्राफी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रासोबतच काही मॉडेल्सवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पण आता या प्रकरणी राज कुंद्राला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. पोर्नोग्राफी केसप्रकरणी राज कुंद्राला सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्यावर्षी शिल्पाच्या पतीला पोर्नोग्राफी केस प्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. (Raj Kundra Pornography Case)

काही आठवड्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राची अटकेपासून संरक्षणाची याचिका फेटाळून लावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या अटकपूर्व जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालय ठरवणार आहे.

शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांना देखील कोर्टाकडून मोठा निर्णय

महत्त्वाचं म्हणाजे राज कुंद्रासह अभिनेत्री आणि मॉडेल्स शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra), पूनम पांडे (Poonam Pandey) यांच्या विरोधात देखील आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आता पूनम पांडे, शर्लिन चोप्रा यांनाही जामीन मिळाला आहे. पॉर्न व्हिडिओची निर्मिती आणि त्याचं वितरण केल्याचा गुन्हा राज कुंद्रावर आहे.

नक्की काय आहे प्रकरण?  
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा Pornography प्रकरणी चर्चेत आला आहे.  गेल्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्राने काही मॉडेल्स आणि स्ट्रगलिंग अभिनेत्रींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावल्याचा आरोप केल्यानंतर राज कुंद्रावर आहे. (raj kundra current affairs)

गेल्यावर्षी पॉर्न सिनेमे बनवत इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला. या आरोपांनंतर कित्येक दिवस राज कुंद्रा तुरुंगात देखील होता. पण आता पुन्हा आरोपपत्र दाखल केल्यामुळे राज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.