मुंबई : अभिनेता शशी कपूर यांना त्यांचे भाऊ राज कपूर टॅक्सी म्हणायला लागले होते, त्यामागील कारण देखील मजेदार आहे. कारण सत्तर आणि ऐंशीच्या दशकात शशी कपूर यांना मोठ्या प्रमाणात चित्रपट मिळायला लागले होते. स्वाभाविक होतं, त्यांना फार कमी वेळ होता, त्यांची धावाधाव सुरू होती. एका शूटवरून दुसऱ्या शूटवर.
चित्रपटाच्या एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जाण्यासाठी, त्यांना खूप वेळ लागत असे. शशी कपूर तेव्हा दिवसभरात तीन-चार शिफ्टमध्ये काम करत होते. १९७८ साली शशी कपूर यांचे मोठे भाऊ राज कपूर 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमाची निर्मिती करत होते, पण शशी कपूरची वेळ मिळत नसल्याने ते खूप वैतागले.
तेव्हा राज कपूर हे शशी कपूर यांना टॅक्सी म्हणायला लागले होते. शशी कपूर यांचं टॅक्सी भाड्याने घेऊन जातात तसं झालं आहे, शशी यांना चित्रपटासाठी कुणी घेऊन गेलं म्हणजे, त्यांचं टॅक्सीचं मीटर सुरू असतं, तसं आहे, असं राज कपूर म्हणत.
महत्वाची बाब म्हणजे यानंतर शशी कपूर यांनी याच काळात पृथ्वी थिएटरसाठी मोठा खर्च केला, पृथ्वी थियटर ही त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासाठी एक श्रद्धांजली होती.