लग्न होऊन राहुल वैद्यच्या घरी जाताच दिशानं हे काय केलं पाहा

दिशा लागली कामाला... 

Updated: Sep 23, 2021, 12:09 PM IST
लग्न होऊन राहुल वैद्यच्या घरी जाताच दिशानं हे काय केलं पाहा  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : लग्नसोहळे आणि त्यामध्ये असणाऱ्या अनेक परंपरा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीत, अशीच भावना वधु- वराच्या मनात घर करत असते. लग्नाआधीचे विधी, लग्नानंतरच्या परंपरा या साऱ्यामध्ये अनेकदा घरातील मंडळी धमाल करत असल्याचं पाहायला मिळतं. गृहप्रवेशापासून नव्या नवरीची सासरच्या घरात एक नवी इनिंग सुरु होते. यामध्ये पुढचा टप्पा असतो तो म्हणजे स्वयंपाकघरात आपलं कौशल्य दाखवण्याचा. (Wedding rituals Viral Video)

गायक राहुल वैद्य याच्या लग्नानंतरही हेच चित्र पाहायला मिळालं. जिथं त्याची पत्नी, अभिनेत्री दिशा परमार ही तिच्याच अंदाजात घरातील स्वयंपाक खोलीतून सर्वांचं मन जिंकत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दीर, कॅमेरा घेऊन स्वयंपाकघरात येतो आणि दिशा काय करत आहे, असं विचारत असल्याचं दिसतो. तो येताच दिशा 'क्योकी सास भी कभी बहूँ थी' या मालिकेतील गाणं गाताना दिसते आणि आपण लाडक्या दीरासाठी चहा बनवत असल्याचं सांगते. 

अवघ्या काही सेकंदांचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यानिमित्तानं चाहत्यांना राहुल वैद्यच्या घरातील दृश्यही पाहण्याची संधी मिळाली आहे. शिवाय पत्नी आणि सून म्हणून दिशा तिच्या या नव्या भूमिकेला नेमकी कशी निभावत आहे याची झलकही चाहत्यांना पाहण्याची संधी मिळाली आहे.