राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे

Updated: Jul 6, 2021, 06:01 PM IST
राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात title=

मुंबई : राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. राहुल आणि दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली असून बातमीनुसार दोघेही या महिन्यात लग्न करणार आहेत. राहुल-दिशा आतापासून काही दिवसांतच सात फेरे घेणार आहेत. राहुलने आपल्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे.

एका वृत्तानुसार, दोघंही 16 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्न अगदी साध्या आणि काही लोकांमध्येच हे लग्न पार पडणार आहे. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला, 'दिशा आणि मला दोघांनाही अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. आम्हाला फक्त आमच्या जवळच्या लोकांनी या लग्नात हजेरी लावावी आणि आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. लग्न वैदिक पद्धतीने होईल आणि सोहळ्यात गुरबानी शबदही गायले जातील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राहुल आणि दिशा गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले मित्र होते. पण बिग बॉसमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केलं आणि दिशासुद्धा नकार देऊ शकली नाही. दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुलने तिला अतिशय खास मार्गाने प्रपोज केलं. राहुलची प्रपोज करण्याची ही स्टाईल संपूर्ण देशाला पसंत पडली. यानंतर दिशाचं उत्तर जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक झाले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिशाला बिग बॉसच्या घरात बोलावलं आणि तिने राहुलचं प्रपोज मान्य केलं.

बिग बॉसपासून राहुल बराच चर्चेत राहिला. राहुल बिग बॉस 14चा उपविजेता होता. मात्र आपल्या साधेपणाने त्याने जनतेची मने जिंकली. खूप लवकरच राहुल कलर्सच्या 'खतरों के खिलाडी 11' या शोमध्ये दिसणार आहेत.