Rahul Vaidya आणि Disha Parmar अडकले विवाह बंधनात; व्हिडिओ व्हायरल

राहुल - दिशा यांचा व्हिडिओ 'मधाणया' रिलीज झाला आहे. 

Updated: Apr 18, 2021, 04:04 PM IST
Rahul Vaidya आणि  Disha Parmar अडकले विवाह बंधनात; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांचा बहुप्रतिक्षीत व्हिडिओ 'मधाणया' रिलीज झाला आहे. हे गाणं रिलीज होताचं  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 18 एप्रिल रोजी 'मधाणया' यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. आतापर्यंत  लाखो लोकांनी या गाण्याला पाहिलं आहे. हे गाणे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. यापू्र्वी 'मधाणया'चा ऑडिओ रिलीज करण्यात आला. चाहत्यांनी या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला. 

गाण्यात राहुल - दिशा यांच्या लग्नाची कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  'बिग बॉस'च्या घरात राहुलने आपली गर्लफ्रेंड दिशा परमार हिला प्रपोज केले, त्यानंतर राहुल आणि दिशा आता लग्न कधी करणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. पण अखेर राहुल आणि दिशा यांनी लग्नगाठ बांधली आहे. राहुल वैद्यने फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली.