राहुल रॉयचं बदलेलं रूप ओळखणं कठीण ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

'आशिकी' चित्रपटातून चर्चेमध्ये आलेला राहुल रॉय पुन्हा त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे.

Updated: May 29, 2018, 08:55 PM IST
राहुल रॉयचं बदलेलं रूप ओळखणं कठीण ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल   title=

मुंबई : 'आशिकी' चित्रपटातून चर्चेमध्ये आलेला राहुल रॉय पुन्हा त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. अनेक दिवस सिनेसृष्टीपासून दूर असलेला राहुल लवकरच नवा चित्रपट घेऊन येणार आहे. सोशल मीडियावर त्यांनी नवा लूक शेअर केला आहे. 

तुम्ही ओळखलं का? 

'नाईट अ‍ॅन्ड फॉग' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणारा राहुल रॉय याने त्याचा खास लूकमधील फोटो शेअर करण्यात आला आहे. एका मुस्लिम व्यक्तीच्या भूमिकेत असलेल्या राहुल रॉयने खास फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. त्याचा फोटो पाहून ओळखणं कठीण झाले आहे. तनवीर अहमद यांच्या 'नाईट अ‍ॅन्ड फॉग' या चित्रपटात राहुल रॉय झळकणार आहे. 1990 साली महेश भट्ट्च्या 'आशिकी' या ब्लॉकबस्टर चित्रपटामधून राहुल रॉयने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची जोडी लोकांच्या खास पसंतीला उतरली होती. 

वेलकम टू रशिया 

नितिन गुप्ता दिग्दर्शित 'वेलकम टू रशिया' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नेओले फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. चित्रपटामध्ये राहुल एका भ्रष्ट पोलिसाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात लव्ह अ‍ॅन्गलही दाखवण्यात आला आहे. चित्रपटात तो अर्धा रशियन आणि अर्धा भारतीय दाखवण्यात आला आहे.  

सिनेसृष्टीपासून दूर  

राहुल रॉय सिनेसृष्टीपासून दूर गेला होता. तो 8 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये होता. राहुल रॉयने 'बिग बॉस' च्या पहिल्या भारतीय सीझनचं जेतेपद पटकावलं होतं.