Radhika Apte : राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ती प्रत्येक पात्रात स्वतःचा जीव ओतून काम करते. तिचे सगळे चित्रपट हे तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाले आहेत. राधिका नं काही दिवसांपूर्वी सेक्स कॉमेडी या विषयाचावर खुलासा केला. राधिका ने सांगितले की, तिने बदलापूर या चित्रपटात विनय पाठक याच्या बायकोची भूमिका साकारलेली. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राधिकाला सेक्स कॉमेडी सारख्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि त्याचं कारण झालं तिने त्या चित्रपटात आपल्या नवऱ्याच्या बचावासाठी एका खोलीत वरून धवन सोबत शूट केलं होतं. या सीन मुळे तिला आजही सेक्स कॉमेडीच्या ऑफर येत आहेत. (Radhika Apte scene in the film was expensive Revealed nz)
राधिका आपटे ने पुढे सांगितलं की, मला सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपट करायला काही हरकत नाही. जसं हंटर देखील सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपट होता. अनेकदा अशा सेक्स कॉमेडी चित्रपटांमुळे महिलांचा अपमान होण्याची शक्यता जास्त असते. आणि याकरिताच मला सेक्स कॉमेडी करायला आवडत नाही.
तिने पुढे सांगितलं की, तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचता तेव्हा तुम्हाला एक अंदाज येतो की एखादी फिल्म ही कोणत्या प्रकारचा संदेश देत आहे. मला एखाद्या चित्रपटात अतिरेकी पुरुष महिलांसोबत कसं वागतात असे चित्रपट करायला हरकत नाही. पण अशा चित्रपटांत दाखवायचं काही वेगळं असतं आणि दाखवलं काही वेगळं जातं आणि मला हेच करायला नाही आवडत.
राधिका आपटे च्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर शेवटी तिला 'विक्रम वेदा' या चित्रपटात पाहिले होते. ज्यात रितिक रोशन आणि सैफ अली खान होते. त्या चित्रपटात तिनं सेफ ची बायको आणि वकिलाची भूमिका साकारली होती. ती पुढे नेटफ्लिक्स वरील 'मोनिका' आणि 'ओ माय डार्लिंग' या चित्रपटांमध्ये तिची झलक पाहायला मिळेल.