मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज काहि दिवसांपुर्वी प्लॅनेट मराठीवर रिलीज झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसला असेल हे नक्की.
दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांची 'रानबाजार' ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. ही वेबसिरीज पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड सिरीज असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. प्रेक्षकामध्ये ही वेबसिरीज प्रचंड पसंतीस उतरत आहे. सध्या सगळीकडेच या वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरुये.
या सगळ्या चर्चा सुरु असताना प्राजक्ता पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती मध्ये ती म्हणाली, ''जेव्हा वजन वाढवायचं होतं तेव्हा मी शरिराला इतक्या सवयी लावून ठेवल्या होत्या की, माझं शरीर एक्ट्रा अन्न घेत नव्हतं. मला लूसमोशन झाले, उलट्या झाल्या किती तरीवेळा. कारण मी एक्सेसीव्ह खात होते. जे शरीर accepct करत नव्हतं. होतं ते सगळं बाहेर पडत होतं. मग मला हळू-हळू सवय लावावी लागली. प्राजक्ताचं हे वक्तव्य ऐकून तिचे चाहते तिची काळजी करत आहेत.
रानाबाजार या वेबसिरीजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं सर्वस्तरावरुन कौतूक होत आहे. या सिरिजचे पुढचे दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.