या अभिनेत्याच्या मुलाने जिंकलं ब्रॉन्ज मेडल, देशांची मान उंचावली

अभिनेत्याने केलं शेअर

shailesh musale Updated: Apr 10, 2018, 12:10 PM IST
या अभिनेत्याच्या मुलाने जिंकलं ब्रॉन्ज मेडल, देशांची मान उंचावली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने थायलंडमध्ये आयोजित ऐज स्विमिंग चॅम्पियनशिप 2018 मध्ये भारतासाठी 1500 मीटर फ्रिस्टाइलमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकलं आहे. वेदांत हा 12 वर्षांचा आहे. वेदांतने देशाचं नाव उंचावलं आहे. वेदांतच्या या यशाने आर माधवनला खूप आनंद झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

आर माधवनने म्हटलं आहे की, 'सरितासाठी गौरवाचा क्षण. वेदांतने स्विमिंगमध्ये भारतासाठी पहिलं मेडल जिंकलं आहे. शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. या पोस्टला एक लाखापेक्षा अधिका लोकांनी शेअर केलं आहे तर हजारपेक्षा अधिका लोकांनी यावर कमेंट केली आहे.

आर माधवनची थ्री इडियटमधली भूमिका खूप गाजली होती. त्याने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.