अखेर प्रतिक्षा संपली! या OTT प्लॅटफॉर्म पाहता येणार पुष्पा सिनेमा

अखेर प्रतिक्षा संपली! आता कुठेही आणि कधीही पाहता येणार पुष्पा सिनेमा 

Updated: Jan 14, 2022, 02:47 PM IST
अखेर प्रतिक्षा संपली! या OTT प्लॅटफॉर्म पाहता येणार पुष्पा सिनेमा title=

मुंबई : अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदनाचा पुष्पा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप जास्त हिट ठरला. साऊथ भाषांसोबतच हिंदीमध्येही तेवढीच छप्पर फाड कमाई केली आहे. ज्यांनी अजूनही हा सिनेमा पाहिली नाही किंवा पाहायचा राहिला आहे त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 

पुष्पा सिनेमा अखेर OTT प्लॅटफॉर्मवर आला आहे. ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise)  हिंदी भाषेतील सिनेमा आता तुम्हाला OTTवर पाहता येणार आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगुमध्ये शूट केला. मात्र लोकांचं अपार प्रेम पाहून मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत डब करण्यात आला. 

या सिनेमाला साऊथमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे चाहते बऱ्याच दिवसांपासून हिंदीतील सिनेमाची वाट पाहत होते. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 

'पुष्पा: द राइज' OTT वर हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट शुक्रवारी रात्री 12 वाजता Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कॅप्शन दिले आहे - 'हा सिनेमा नाही.. फायर'. Amazon प्राइम व्हिडिओने रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे.

अल्लु अर्जुनच्या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील डायलॉग आणि गाणी लोकांनी डोक्यावर उचलून घेतली आहेत. सोशल मीडियावर सध्या पुष्पाची तुफान चर्चा आहे.