Pushpa Collection : 'पुष्पा'च्या कमाईला बहर; विक्रमी आकडे बड्या कलाकांनाही धडकी भरवणारे

ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीत पाहायचाय हा चित्रपट? 

Updated: Jan 12, 2022, 04:32 PM IST
Pushpa Collection : 'पुष्पा'च्या कमाईला बहर; विक्रमी आकडे बड्या कलाकांनाही धडकी भरवणारे  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असणाऱ्या 'पुष्पा- द राईज' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिली केली आहे. दाक्षिणात्य चाहत्यांनी या चित्रपटाला दमदार प्रतिसाद दिला आहे. आता म्हणे या चित्रपटाच्या हिंदी वर्जनच्या कमाईचा आकडाही 75 कोटींच्या पलीकडे जात 80 कोटींच्या घरात गेला आहे. (Pushpa - the rise)

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. किंबहुना सध्या चित्रपटाच्या कमाईटचे आकडे घटण्यास सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुख्य म्हणजे असं असलं तरीही चित्रपटानं कमाईचा अपेक्षित टप्पा केव्हाचाच ओलांडल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. 

कोरोनाकाळातील नियम लागू असतानाही चित्रपटानं इतकी कमाई करणं ही बाब कौतुकास्पद ठरली आहे. 

रिलीजनंतरच्या चौथ्या आठवड्यात या चित्रपटानं एकूण 81.58 कोटी रुपये इतका गल्ला जमवला आहे. 

'पुष्पा'ची आतापर्यंतही कमाई पाहता हे आकडे 340 कोटींच्याही पलीकडे गेले आहेत. ज्यामुळं भल्याभल्या कलाकारांना त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी हा आकडा गाठणं मोठं आव्हान वाटू लागलं आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी 'पुष्पा' केव्हा प्रदर्शित होणार? 
काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर आता हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. 

Amazon Prime वरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळं हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये सध्या आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.