'हिरवी साडी, भांगेत कुंकू अन्...', ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटातील रश्मिकाचा रावडी लूक समोर

'पुष्पा 2 : द रुल' हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केले आहे.

Updated: Apr 5, 2024, 05:04 PM IST
'हिरवी साडी, भांगेत कुंकू अन्...', ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटातील रश्मिकाचा रावडी लूक समोर title=

Rashmika Mandanna Pushpa 2 First look : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी, संवाद या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता लवकरच ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. आता ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील रश्मिकाचा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. 

'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आज रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त तिचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे.  'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटातील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर आला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. पुष्पा या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट करण्यात आले आहे. यात त्यांनी रश्मिकाला वाढदिवस देताना 'पुष्पा 2' चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. 

'पुष्पा 2' चित्रपटातील पहिला लूक समोर

हॅप्पी बर्थडे श्रीवल्ली, लाखो हृदयांना घायाळ करणारी श्रीवल्ली उर्फ रश्मिका मंदानाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा टीझर 8 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होईल, असे ट्वीट करण्यात आले आहे. यात एक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रश्मिकाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या गळ्यात विविध दागिनेही पाहायला मिळत आहे. यात हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकूही पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'मधील श्रीवल्लीचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

समांथा रुथ प्रभूही झळकणार खास भूमिकेत

'पुष्पा 2 : द रुल' हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन एकत्र झळकणार आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. पुष्पा 2 या चित्रपटात समांथा रुथ प्रभू छोट्या भूमिकेत झळकली आहे. तर या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका पाहायला मिळणार असल्याचे बोललं जात आहे.