11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत

Diljit Dosanjh :  दिलजीत दोसांझनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई-वडिलांपासून तो कसा लांब झाला याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 5, 2024, 04:31 PM IST
11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत title=
(Photo Credit : Social Media)

Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत सिंग दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'चमकीला' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिलजीत दोसांझ हा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या दिलजीतनं त्याच्या खासगी आयुष्याविषयी आता वक्तव्य केलं आहे. त्यानं त्याच्या आई-वडिलांसोबतचं त्याचं नातं कसं होतं... त्याविषयी सांगितलं आहे. त्याला न विचारता त्याला लुधियानाला मामाकडे पाठवण्यात आलं होतं. 

दिलजीत दोसांझनं रणवीर इलाहाबादियाच्या 'द रणवीर शो' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिलजीतनं त्याच्या लहाणपणीच्या आणि आई-वडिलांविषयी देखील सांगितलं. दिलजीत दोसांझनं सांगितलं की त्याच्या आई-वडिलांना त्याचं सुंदर आयुष्य हवं होतं. त्याचं त्याच्या आई-वडिलांवर खूप प्रेम होतं. पण त्याचे त्याच्या आई-वडिलांसोबतचे संबंध हे तुटल्या सारखे आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिलजीत दोसांझनं सांगितलं की "मी तेव्हा 11 वर्षांचा होता. जेव्हा मी घर सोडलं आणि माझ्या मामासोबत राहायला लागलो. माझं गाव सोडून मी शहरात आलो होतो. मी लुधियानाला शिफ्ट झालो. माझ्या मामानं सांगितलं की याला माझ्यासोबत शहरात पाठवा आणि माझे आई-वडील म्हणाले हो, घेऊन जा. माझ्या आई-वडिलांनी मला एकदाही विचारलं देखील नाही." 

त्यानं पुढे सांगितलं की "एका छोट्या रुममध्ये मी एकटा झोपायचो. मी फक्त शाळेत जायचो आणि परत यायचो. तिथे कोणताही टिव्ही नव्हता. माझ्याकडे खूप वेळ होता. तेव्हा आमच्याकडे फोन देखील नव्हता. जर मला घरी फोन करायचा असेल किंवा माझ्या आई-वडिलांचा फोन आला तर त्यासाठी देखील पैसे लागायचे. तर अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबापासून लांब झालो."

दिलजीत दोसांझनं सांगितलं की त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला होता. पण आता त्याचं नातं फक्त त्यांच्याशीच नाही तर सगळ्यांशीच तुटलंय. त्यानं म्हटलं की "मी माझ्या आईचा आदर करतो. माझ्या वडिलांचा खूप चांगला स्वभाव आहे. त्यांनी मला काही विचारलं नाही. त्यांनी हे देखील विचारलं नाही की मी कोणत्या शाळेत शिक्षण केलं, पण माझं त्यांच्याशी नातं तुटलं. फक्त त्यांच्यासोबत नाही तर सगळ्यांसोबतच." 

हेही वाचा : 'मला पाचवा महिना सुरु होता अन्...', कविता लाड यांनी सांगितला रंगमंचावरील 'तो' किस्सा

दरम्यान, दिलजीतच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात परिणीति चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय दिलजीत दोसांझ हा करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या 'क्रू' मध्ये दिसणार आहे.