खूप शेअर होतोय हा व्हीडिओ, भजनात अचानक ''पुष्पा आणि श्रीवल्ली''

 भजनात अचानक पुष्पा आणि श्रीवल्ली आल्याने हे व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेन्ड होत आहे.  

Updated: Jan 30, 2022, 06:49 PM IST
खूप शेअर होतोय हा व्हीडिओ, भजनात अचानक ''पुष्पा आणि श्रीवल्ली'' title=

देवगड : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा सिनेमाचं गारुड आता सर्वांवरच आहे, त्यात कोकणातील देवगडचं हे भजनी मंडळ (Bhajan Mandali) तर कुठे सुटणार आहे, संगीताला (Music) काही मर्यादा नसतात, ना कुणाचं वावडं असतं. या भजनात अचानक पुष्पा (Pushapa) आणि श्रीवल्ली (Shreevali) आल्याने हे व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेन्ड होत आहे. या भजनात या निमित्ताने पुष्पा आणि श्रीवल्ली तर आले, पण हा व्हीडिओ सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सर्वत्र शेअर होत आहे. (pushapa and shreevali in bahjan at devgad kokan)

पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर विशिष्ट ओळींवर थिरकणारे, तसाच डान्स करणारे कलाकार तर शॉर्टस व्हीडिओंमधून आपली किमया दाखवतायेत. त्यात हे भजन म्हणजे अप्रतिम असल्याचं नेटकरी म्हणतातय...तेव्हा तेरी झलक श्रीवल्ली...असंच म्हणू या...