Pulwama Attack, टी सिरीजचा आतिफ असलमला दणका

सामान्य जनता त्याचप्रमाणे बॉलिवूड मंडळी हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करताना दिसत आहे. हल्ल्याचा निषेध करत टी-सिरीज म्यूझिक कंपनीने एक ठोस पाउल उचलले आहे.  

Updated: Feb 17, 2019, 04:46 PM IST
Pulwama Attack, टी सिरीजचा आतिफ असलमला दणका title=

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण देशात हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. 
पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे. सामान्य जनता त्याचप्रमाणे बॉलिवूड मंडळी हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करताना दिसत आहे. हल्ल्याचा निषेध करत टी-सिरीज म्यूझिक कंपनीने एक ठोस पाउल उचलले आहे.  

टी-सिरीज म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायक अतिफ असलमच्या गाण्याला युट्यूब वरुन काढून टाकण्यात आले आहे. म्यूझिक कंपनीकडून यासंबंधीत कोणत्याही प्रकारची आधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण आतिफ असलमचं गाणं अॅनलिस्ट टॅगसोबत दिसत आहे. १२ फेब्रुवारी रोजी 'बारिशें' गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. 

कसे केले जाते अॅनलिस्ट
कोणत्याही व्हिडिओला अॅनलिस्ट केल्या नंतर सर्च करुन शोधू शकतो. पण हे गाणे पाहण्यासाठी एका विशिष्ठ युट्यूब चॅनलवर जावून पाहु शकतो. नाही तर युजर कडे गाण्याची लींक असणे गरजेचे आहे. आता हे उघड आहे की सामान्य माणसांना हे गाणे पाहता येणार नाही.

पाकिस्तानी गायक अतिफ असलमच्या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत पण झळकली होती. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले होते. पुलवामा हल्ल्यानंतर टी सिरीजचे मालक भूषन कुमारने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.