'बहिणीच्या लग्नात यायला वेळ नव्हता, आता कशी आली?' भारतात येताच ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

Priyanka Chopra Troll :  प्रियांका चोप्राला मुंबईत येताच पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. थेट बहिणीच्या लग्नात यायला वेळ नाही आणि आता आलीस असं थेट तिला सुनावलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 27, 2023, 12:18 PM IST
'बहिणीच्या लग्नात यायला वेळ नव्हता, आता कशी आली?' भारतात येताच ट्रोल झाली प्रियंका चोप्रा title=
(Photo Credit : Social Media)

Priyanka Chopra Troll : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एक ग्लोबल स्टार आहे. पती निक जोनससोबत परदेशात राहणारी प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप कमी वेळ भारतात येते. तिची चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाला देखील येऊ शकली नव्हती. आता तिच्या लग्नाच्या जवळपास महिनाभरानंतर प्रियांका भारतात आली आहे. प्रियांका नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात ती स्टायलिश लूकमध्ये दिसत असून तिचा नेकलेस चर्चेत आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं प्रियांका चोप्राचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियांकानं काळ्या रंगाचं क्रॉप टॉप, ब्लॅक ओव्हरकोट आणि राखाडी रंगाची जॉगर्स परिधान केली आहे. प्रियांकाचा हा स्पोर्टी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या या व्हिडीओवर रिअॅक्शन देत तिच्या लूकची तारिफ केली आहे. त्यासोबत तिच्या फिटनेसची देखील स्तुती केली आणि ती भारतात आली त्याचा आनंद व्यक्त केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी प्रियांकाला प्रश्न विचारला आहे की 'बहिणीच्या लग्नात देखील आली असती.' तर दुसरा नेटकरी म्हणाला की 'परिणीतिच्या लग्नात तू का आली नाहीस?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या साठी तिच्याकडे वेळ आहे पण बहिणीच्या लग्नात यायला वेळ नाही.' तर काहींनी प्रियांकाविषयी तिचं प्रेम व्यक्त केलं. तर काही नेटकऱ्यांनी तिनं लेक मालतीच्या नावाचं नेकलेस परिधान केल्यानं तिची स्तुती केली आहे. अनेकांनी म्हटलं आहे की 'यावरून तिचं तिच्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता प्रियांका का आली भारतात? 

प्रियांका चोप्राही मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून होणार आहे. तर 5 नोव्हेंबर पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. केल्यावेळी प्रियांका तिची लेक मालती मेरी आणि पती निक जोनससोबत भारतात आली होती. 

हेही वाचा : 'महिला फक्त शारिरीक सुखासाठी...', सुब्रमण्यम स्वामी यांच्या खोचक टीकेवर कंगनाची संतप्त पोस्ट

प्रियांकाचे प्रोजेक्ट्स

प्रियांका चोप्रा सगळ्यात शेवटी लव अगेनमध्ये दिसली होती आणि त्याशिवाय तिची सिटाडेल ही वेब सीरिज देखील आली होती. त्यातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान, 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बैक टू' या दोन चित्रपटानमध्ये दिसणार आहे. त्याच्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यग्र आहे.