क्वॉंटिकोमध्ये 'असा' असेल प्रियांका चोप्राचा लूक

बॉलिवूड, प्रादेशिक चित्रपट यानंतर सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. 

Updated: Jan 10, 2018, 03:40 PM IST
क्वॉंटिकोमध्ये 'असा' असेल प्रियांका चोप्राचा लूक   title=

मुंबई : बॉलिवूड, प्रादेशिक चित्रपट यानंतर सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. 

'क्वॉटिंको' या हॉलिवूडमधील सीरीजकडे सार्‍यांचे लक्ष  लागले आहे. लवकरच क्वॉंटिकोचा तिसरा सिझन सुरू होणार आहे. सध्या प्रियांका या सीझनच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिसर्‍या सीझनचा प्रिमियर 26  एप्रिलला येणार आहे. 

इंस्टाग्रामवर माहिती  

प्रियांकाने 'क्वॉंटिंको' बद्दलचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिसरा सीझन ' क्वॉंटिको 3 द रिटर्न ऑफ एलेक्स पेरिश' या नावाने येणार आहे. 

प्रियांका चोप्रा एलेक्स पेरिशचा रोल साकारणार आहे.  काही दिवसांपूर्वी प्रियांकाने त्यातील खास लूक शेअर केला होता.  

 

 

हॉलिवूड सिनेमे 

दरम्यान प्रियांका चोप्रा काही दिवसांसाठी भारतामध्ये आली होती. क्वॉंटिंको सोबतच 'Isn’t It Romantic' , 'A Kid Like Jake'या चित्रपटांमध्ये प्रियांका झळकणार आहे. बेवॉच चित्रपटातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.