'स्त्री 2' चित्रपटातील 'या' गाण्याचं प्रियंका चोप्राकडून कौतुक, म्हणाली...

'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाने खास परफॉर्मन्स केला आहे. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता प्रियांका चोप्रानेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 11, 2024, 12:31 PM IST
'स्त्री 2' चित्रपटातील 'या' गाण्याचं प्रियंका चोप्राकडून कौतुक, म्हणाली... title=

Priyanka Chopra : 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. या चित्रपटाने या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका असलेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाली 'आज की रात' या गाण्यातील अभिनेत्री तमन्ना भाटियाचा डान्स आणि अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा देखील या यादीत समावेश झाला आहे. प्रियांका चोप्राने या गाण्याचे खूप कौतुक केलं आहे. 

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा स्टोरीवर 'स्त्री 2' च्या स्टारकास्टचे कौतुक केलं आहे. 'आज की रात' या गाण्याचे वर्णन तिने धमाकेदार म्हणजेच हृदयस्पर्शी गाणे असं केलं आहे. तसेच गाण्यातील तमन्ना भाटियाच्या डान्स आणि अभिनयाचे देखील तिने कौतुक केलं आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, 'तमन्ना भाटिया, खूप चांगली' आहे. तिने श्रद्धा कपूरचे देखील कौतुक केलं आहे. ती नेहमीच 'क्वीन' राहणार असल्याचे तिने म्हटलं आहे. राजकुमार रावच्या विकीच्या व्यक्तिरेखेचे ​​देखील कौतुक करताना प्रियांकाने त्याला 'गोल्ड' म्हटलं आहे.

तमन्ना भाटियाने मानले प्रियांकाचे आभार

प्रियांका चोप्राने कौतुक केल्यानंतर तमन्ना भाटियाने तिचे आभार मानले आहेत. तसेच राजकुमार राव याने देखील पोस्ट करून 'धन्यवाद प्रियांका' असं म्हणत आभार मानले आहेत. 'आज की रात' हे गाणं खूप खास आहे. ज्यामध्ये तमन्ना भाटियाने खास डान्स केला आहे. हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. तसेच हे गाणं मधुबंती बागची आणि दिव्या कुमार यांनी गायले आहे. याशिवाय सचिन-जिगर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 

'स्त्री 2'ने केली 700 कोटींहून अधिक कमाई

रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' ने जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात चंदेरी गावाची कथा दाखवण्यात आली आहे. विकी म्हणजेच (राजकुमार राव), बिट्टू म्हणजे (अपारशक्ती खुराना) आणि रुद्र भैय्या म्हणजे (पंकज त्रिपाठी) हे चंदेरीचे रहिवासी आहेत. 'स्त्री 2' हा हॉरर कॉमेडी विश्वातील चौथा चित्रपट आहे.