प्रियांका बॉयफ्रेंड निकसोबत डिनर डेटवर

नुकतंच या दोघांना सोबत पाहिलं गेलं. निक जोनससोबत डिनर डेटसाठी प्रियांका दाखल झाली होती.  

Updated: Jun 2, 2018, 10:52 PM IST
प्रियांका बॉयफ्रेंड निकसोबत डिनर डेटवर title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. प्रियांका - निक यांची जवळीकही वाढताना दिसून येतेय. नुकतंच या दोघांना सोबत पाहिलं गेलं. निक जोनससोबत डिनर डेटसाठी प्रियांका दाखल झाली होती. तेव्हा कॅमेऱ्यापासून काही ते लपू शकले नाहीत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एलए डोगर्स स्टेडियममध्ये दोघांनाही बेसबॉल मॅच पाहताना स्पॉट करण्यात आलं. यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांणा उधाण आलं. 

PHOTOS: निक जोनस संग प्रियंका चोपड़ा फिर 'डेट' पर
प्रियांका आणि निक डिनर डेटवर

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका निकसोबत वेस्ट हॉलिवूडच्या टोका माडेरा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री ८.०० च्या सुमारास दाखल झाली होती. यावेळी प्रियांका आणि निक यांना एकमेकांसोबत बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारताना पाहिलं गेलं.

निक जोनस हा एक अमेरिकन सिंगर आणि गीतकार आहे. तो २५ वर्षांचा आहे. प्रियांकाशी त्याची भेट टीव्ही कार्यक्रमा 'क्वांटिको'च्या दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं.