अभिनेत्री प्रियांकाला कशाची कमी, आता का विकतेय भांडी?

लेकीच्या जन्मानंतर काय काय करतेय देसी गर्ल, चाहत्यांनाही पडलाय प्रश्न; आधी जेवण आता भांडी पुढे काय

Updated: Jul 1, 2022, 04:15 PM IST
अभिनेत्री प्रियांकाला कशाची कमी, आता का विकतेय भांडी? title=

मुंबई : आपल्या अभिनयाने जगभरात लोकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या प्रियांक चोप्राने आता पैसे कमवण्याचा नवा फंडा शोधला आहे. प्रियांकाचा अभिनय जगभरात प्रसिद्ध आहेच. प्रियांकाच्या अभिनयासोबत आता या फंड्याचीही चर्चा होत आहे.

लेकीच्या जन्मानंतर प्रियांका चोप्रा काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता त्याचं उत्तर सगळ्यांना मिळालं आहे. ती जे करते ते पाहून चाहते हैराण झाला आहे. प्रियांकाने हे काम सुरू केल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

प्रियांका अभिनयाव्यतिरिक्त अनेक गोष्टी करते. तिने रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. ज्याचं नाव सोना आहे. आता तिने ऑनलाईन भांडी विकायला सुरुवात केली आहे. यामुळे तिला चाहते ट्रोल करत आहेत. 

प्रियांका चोप्राने इंडियन होमवेयर लाइनअप लाँच केलं आहे. ज्याचं नाव सोना होम आहे. ही ऑनलाईन साईट लाँच झाल्यानंतर काही दिवसांत या साईटवरील प्रोडक्टच्या किंमती खूप जास्त आहे. या महागड्या किंमतीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

सोना होम ब्रँडच्या वेबसाईटवर एका टेबल क्लॉथची किंमत 30,612 रुपये आहे. तर डिनर नॅपकिनच्या एका सेटची किंमत 13,284 रुपये आहे. 
एक डिनर प्लेटची किंमत 4,733 रुपये आहे. तर एक सर्विंग बाउल किंमत 7,732 रुपये आहे.

एका चहाच्या कपबशीची किंमत 5,365 रुपये तर एका मगाची किंमत 3471 रुपये आहे. तिच्या साईटवरील भांड्यांच्या किंमती ऐकून लोक हैराण झाले आहेत. अनेकांनी याची खिल्ली देखील उडवली आहे.