प्रियंकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रियंकाने ओपरा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीपसह इतर आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे.

Updated: Mar 20, 2019, 02:21 PM IST
प्रियंकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा title=

नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्राचं नाव युएस टुडेच्या 'मनोरंजन जगातील 50 सर्वात शक्तीशाली महिलां'च्या यादीत सामील झालं आहे. प्रियंकाने ओपरा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीपसह इतर आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. या यादीत हॉलिवूड पॉप सिंगर बेयॉन्से, टेलिव्हिजन स्टार एलेन डीजेनेरस, ऑस्कर विजेता जेनिफर लॉरेंस आणि आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जेनिफर लोपेजही सामील आहेत. 

ट्रोलिंग पर पहली बार बोलीं प्रियंका चोपड़ा, 'मुझे समझ नहीं आता किसी व्यक्ति की राय खबर कैसे बन जाती है'

या यादीत नाव सामिल झाल्याने सन्मानित वाटत असल्याचं प्रियंकाने सांगितलं. या अद्भूत महिलांच्या यादीत माझं नाव आल्याने मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजते. या महिलांनी आलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत स्वत:ची वेगळी ओळख बनवली असून त्या करियरच्या यशाच्या पायरीवर उभ्या असल्याचं प्रियंकाने म्हटलंय.

प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही अॅक्टिव्ह आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम कामगिरीनंतर प्रियंकाने संगीत क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकी टेलिव्हिजन ड्रामा सीरीज 'क्वांटिको'मध्ये एलेक्स पॅरिशची भूमिका साकारत आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळवली. अॅक्शन-कॉमेडी 'बेवॉच'मधून 2017 साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जोनस ब्रदर्सच्या 'सकर'मध्येही प्रियंका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बॉलिवूडच्या 'द स्काय इज पिंक'मधून प्रियंका भूमिका साकारणार आहे.