Video: शेवटी आईच ती! 42 दिवसांपासून दूर राहिलेल्या गायिकानं दौऱ्याहून परत येताच लेकाला मारली कडकडून मिठी

Singer Emotional Video With Her Son: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की लोकप्रिय गायिका ही आपल्या लेकाला बऱ्याच दिवसांनी दिसते आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 13, 2023, 06:52 PM IST
Video: शेवटी आईच ती! 42 दिवसांपासून दूर राहिलेल्या गायिकानं दौऱ्याहून परत येताच लेकाला मारली कडकडून मिठी title=
July 13, 2023 | priyanka barve emotional video goes viral meeting her son after 42 days (Photo: Priyanka Barve | Instagram)

Priyanka Barve Emotional Video With Her Son: हल्लीच्या स्त्रिया या घर आणि आपलं करिअर चांगलचं बॅलेन्स करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. अशाच एका गायिकेची सध्या चर्चा रंगली आहे. ही गायिका आपल्या गायनाच्या कार्यक्रमासाठी अनेक दिवसांसाठी दौऱ्यावर गेली होती त्यामुळे आपल्या दोन वर्षांच्या लेकापासून ती दूर होती. आता ती परत आली असून यावेळी तिची आपल्या लेकासोबत भेट झाली आणि मग ती आपलं इमोशन्स सांभाळता आले नाहीत. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून अनेक जणं घायाळ झाले आहेत. अनेकांना हा क्यूट आणि इमोन्शनल व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून प्रियांका बर्वे आहे. सध्या तिनं आपल्या इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

''तिनं यावेळी लिहिलंय की, मुगल ए आजमचे शो संपवून मी 42 दिवसांनी परत आली आहे. मला खूप छान वाटतं. अशा प्रकारे माझा युएस दौरा पार पडला आहे. मला माझ्या लेकाचा फार अभिमान वाटतो आहे. माझ्यासाठी तो म्हणजे एक प्रेरणा होता. सोबतच मला फार आनंद वाटतो आहे की मला इतकी चांगली पाठिंबा देणारी फॅमिली मिळाली आहे.'' सध्या तिच्या या व्हिडीओवर सगळ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी तिच्या या व्हिडीओवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे तिची सर्वत्र फारच चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा - ''शूsss ओरडू नका'' सारा अली खानचा संताप झाला अनावर! चित्रपट हीट झाल्यानंतर बदलला attitude?

यावेळी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की प्रियांका एअरपोर्टवर दिसते आहे. तिच्या हातात भरपूर बॅग्स आहेत. सोबतच समोरून तिचा लाडका लेक येताना दिसत आहे अशाच तिच्या या व्हिडीओचीही चर्चा रंगली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे अनेकांना आपल्याही अशाच एका इमोशनल क्षणाची आठवण झाली आहे. त्यामुळे या व्हिडीओखाली नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. किती गोड, खूप छान अशा नानाविध कमेंट्स यावेळी या व्हिडीओ खाली येताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर प्रियांका बर्वे ही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. अशाच आता तिनं आपल्या लेकाचा हा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. तिच्या मुलाचे नावं युवान आहे आणि त्याचसोबत ती आपल्या लेकाचा व्हिडीओ हा अनेकदा व्हायरल करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते.