रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारियरला या कारणाने सोडावे लागले घर!

रातोरात एका छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारिअरची नजर अजूनही प्रेक्षकांना विसरता येत नाहीये.

Updated: Feb 13, 2018, 04:33 PM IST
रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारियरला या कारणाने सोडावे लागले घर! title=

मुंबई : रातोरात एका छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारिअरची नजर अजूनही प्रेक्षकांना विसरता येत नाहीये.

प्रियाच्या त्या व्हिडिओचे अनेक व्हर्जन्स आता सोशल मीडियात बघायला मिळत आहे. ती आता मोठी स्टार झाली असली तरी तिला या स्टार होण्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. 

प्रियाला लोकप्रियतेने खुश

प्रियाला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाने नक्कीच आनंद झाला असेल. मात्र तिच्या कुटुंबियांना चांगलाच मनस्ताप होतो आहे. प्रियाने चाहत्यांच्या प्रेमावर आनंदही व्यक्त केलाय. त्यानंतर आता तिच्या आईने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या लोकप्रीयतेने प्रिया प्रकाश किती आनंदी आहे, हे आम्हाला ठाऊक नाही, असे म्हणत तिच्या आईने यावर नाराजीच व्यक्त केली आहे. 

काय म्हणाली प्रियाची आई?

thenewsminute.com या वेबसाईटसोबत बोलताना प्रियाची आई प्रीथा यांनी चिंता व्यक्त केलीये. प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तिला होस्टेलवर पाठवण्यात आल्याचे तिच्या आईने सांगितले. होस्टेलवर का पाठवले? असा प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या की, एका रात्रीत प्रियाला मिळालेली लोकप्रीयता बघून मी घाबरले. दिग्दर्शकाने सिनेमाच्या रिलीजपूर्वी प्रियाला कुठलीही मुलाखत न देण्याचे बजावले आहे. सिनेमाचे काहीच सीन्स शूट झाले आहेत. त्याआधीच प्रिया इतकी लोकप्रिय झालेली पाहून मी तिला होस्टेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. 

 

Thank you for all the love and support

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

आणि प्रियाला सिनेमा मिळाला...

त्यांनी पुढे सांगितले की, ‘प्रिया एका रात्रीत स्टार होईल, याची मी कल्पनाही नव्हती. प्रियाला अभिनय आवडत असल्याने आम्ही तिला एका ऑडिशनला घेऊन गेलो. गेल्यावर्षी तिचे ऑडिशन झाले तेव्हा ती १२वीत होती. यात प्रिया सिलेक्ट झाली. पण बोर्डाच्या परिक्षेमुळे ती शूटींगवर जावू शकली नव्हती. त्यावेळी फिल्ममेकरने तिला नव्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी तयार राहा, असे सांगितले होते.