प्रेमममधील 'मलार' ची नवी लव्हस्टोरी, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

'धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना' गाण्याचं वेगळ रुप

Updated: Jul 14, 2020, 11:59 AM IST
प्रेमममधील 'मलार' ची नवी लव्हस्टोरी, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : अल्फोज पुथरिन दिग्दर्शक 'प्रेमम' या सिनेमाने सगळ्याच प्रेक्षकांवर जादू केली. या सिनेमातील महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकार. 'मलार' आणि 'जॉर्ज' या दोघांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'मलार' म्हणजे अभिनेत्री सई पल्लवीची जादू आजही कायम आहे. सई पल्लवीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओबद्दल फार काही माहिती मिळालेली नाही. पण पुन्हा एक सई आणि तिच्या प्रेमाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओत सई आणि अभिनेता शारवानंद यांची एक सुंदर प्रेम कहाणी या गाण्यात पाहायला मिळणार आहे. 

'आशिकी' सिनेमातील 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना' या सिनेमातील गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट केलं आहे. मलर आणि शारवानंद या दोघांची एक सुंदर लव्हस्टोरी या गाण्यात पाहायला मिळते. सई ही एक डॉक्टर आहे आणि या गाण्यात ती डॉक्टरची भूमिका साकारत आहे. 

सई पल्लवी आणि नागा चैतन्य यांच्या आगामी 'लव्ह स्टोरी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून सई पल्लवी या सिनेमांत काम करत असून चित्रपटाचे गाणे कोरिओग्राफ देखील करणार आहे. 'फिदा' आणि 'प्रेमम' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री यामध्ये दिसणार आहे. शेखर कमुला दिग्दर्शित 'लव्ह स्टोरी' सिनेमाचं चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. ‘लव स्टोरी’ या चित्रपटात सई पल्लवी आणि वेंकी मामा अभिनेता नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.