मला Highest Paid कलाकार व्हायचं नाही! मराठी अभिनेत्यांच्या मानधवावर असं का बोलला प्रसाद ओक?

Prasad Oak Does Not Want To Be A Highest Paid Actor : प्रसाद ओकला का व्हायचं नाही Highest Paid कलाकार कारण सांगत म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2024, 11:02 AM IST
मला Highest Paid कलाकार व्हायचं नाही! मराठी अभिनेत्यांच्या मानधवावर असं का बोलला प्रसाद ओक? title=
(Photo Credit : Social Media)

Prasad Oak Does Not Want To Be A Highest Paid Actor : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'धर्मवीर 2' या चित्रपटाची. अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे. तर दुसऱ्या भागात देखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी देखील त्याचं कौतुक केलं. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं होतं. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या ‘धर्मवीर‘चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे 2’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. त्या निमित्तानं सतत माध्यमांना मुलाखत देसत असलेल्या प्रसाद ओकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रसाद ओकनं त्याला 'हाययेस्ट पेड अभिनेता' व्हायची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय भूक मारण्यासाठी ब्लॅक कॉफी पितो याविषयी देखील त्यानं सांगितलं आहे. 

'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं आरपार ऑनलाईन या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रसादला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता असण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावर उत्तर देत प्रसाद ओक म्हणाला, 'मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन व्यक्ती ना विचारावं एक मंजिरी ती माझा सगळा फायनान्स पाहते आणि मंगेश जे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ही दोन लोकं या बद्दल सांगू शकतील पण मला असं वाटतं हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा मी हाययेस्ट रेड ( Read ) कलाकार आहोत का? आपल्या बद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे प्रसादला प्रश्न विचारण्यात आला की आपण जेव्हा एकदा श्रीमंत कॅटेगरीमध्ये दाखल होतो तेव्हा घरी पाळीव प्राणी असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं हे स्टेटस सिम्बल आहेत. ते आपोआप येत जातात... कारण टपरीवरचा चहा आजही तेवढाच आवडू शकतो पण ब्लॅक कॉफीच का? यावर उत्तर देत प्रसाद म्हणाला, 'जेव्हा भूक भागवायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि तेवढं अन्न घेण्याची ऐपतही नव्हती. तर ती भूक मारण्या करता ब्लॅक कॉफी प्यायला लागलो. कॉफीनं भूक मरते. श्रीमंती दाखवण्यासाठी ब्लॅक कॉफी पितात हे मला माहित नव्हतं हे मी पहिल्यांदा ऐकलं आहे. मी जेव्हा ब्लॅक कॉफी प्यायला लागलो ती भूक मारण्यासाठी, जी सवय लागली ती आजपर्यंत आहे.'

हेही वाचा : 'बिग बॉस ओटीटी 3'वरील 'ते' दुष्य पाहून शिंदे गट आक्रमक! अश्लीलता पसरवण्याचा केला आरोप

मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रसाद ओक हा खरंच हाययेस्ट पेड कलाकार आहेत यात शंका नाही. अनेक दमदार भूमिका असो किंवा त्याचं अगदी चोखपणे केलेलं दिग्दर्शन असो. प्रसाद हा एक उत्तम अभिनेता असल्याचं आपल्या सगळ्यांना माहित आहे. 'धर्मवीर 2' नंतर प्रसाद येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करणार असल्याचं देखील कळतंय. हिंदी मराठीच्या सोबतीनं प्रसाद कोणत्या वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.