जेनेलिया रितेशवर सगळ्यांसमोर संतापली, नेमकं प्रकरण काय?

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे दोघंही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीशी जोडले गेले आहेत.

Updated: Feb 12, 2022, 08:36 PM IST
 जेनेलिया रितेशवर सगळ्यांसमोर संतापली, नेमकं प्रकरण काय? title=

मुंबई : जेनेलिया आणि रितेश देशमुख हे दोघंही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीशी जोडले गेले आहेत. जेनेलिया सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. पण सोशल मीडियावर चाहत्यांशी ती सतत जोडलेली असते. येत्या काही दिवसांत दोन्ही स्टार्स त्यांच्या लेटेस्ट पोस्ट्सद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. नुकताच जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ती नोरा फतेहीच्या डान्स मेरी रानी गाण्यावर रितेशसोबत जबरदस्त डान्स करताना दिसतेय. पण, अचानक काहीतरी घडतं ज्यामुळे डान्सचा माहोल पूर्णपणे बदलून जातो.

जेनेलिया डिसूझाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही नाच मेरी रानीवर जबरदस्त डान्स करत आहेत. यामध्ये रितेश डान्समध्ये इतका हरवलाय की, यानंतर जेनेलियाला राग येतो आणि ती रितेशला  मारु लागते. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतीच रितेश देशमुखने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'सगळं सुरू होऊन २० वर्षे झाली आहेत. हे प्रेम नाही, हे तुझ्यासाठी वेडेपणा आहे.  जेनेलिया आणि रितेश यांनी लग्नाआधी 9 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं.